सावनेर येथे बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा

मुकप्राण्यांचा सन्मान करणारी आमची संस्कृती म्हणजेच पोळा : डॉ. आशिष देशमुख

*सावनेर ः शेतकरी आणि सर्जा-राजाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला पारंपरिक ‘बैलपोळा उत्सव’ माताखेडी येथील पोळा मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शंभरच्या वर शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून पूजा-अर्चा करत पोळा मैदानात आणले.आमदार आशिषबाबू देशमुख यांनी बैलजोडी घेऊन उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे अंगवस्त्र व बोजारा देत सन्मानित केले*

*कार्यक्रमास सावनेर मतदारसंघाचे आ. डॉ. आशिष देशमुख, भाजपा नेते रामराव मोवाडे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक मंदार मंगळे, डॉ. विजय धोटे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक मंदार मंगळे यांनी केले. आ. डॉ. आशिष देशमुख यांनी पारंपरिक सण व ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन करत म्हटले की मुकप्राण्यांचा सन्मान करणारी संस्कृती म्हणजे पोळा, पोळा हा नुसता सन नसुन वर्षभर आपल्या खांद्याला खांदा भिडवून शेतात मशागत करणाऱ्या सर्जा राज्याच्या प्रती आपल्या कु्तज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.आज शेतकरी बंधव अनेक संकटाला तोंड देत आपले जिवनव्यापन करत आहे.यावर निसर्ग ही कोपला आहे.अश्यात खचून न जाता धर्याने या कठीण परिस्थिती चा सामना आपणास करावा लागणार असल्याचे मत व्यक्त करत.एक आमदार या नात्याने मी सदैव आपल्या सुखा दुखाःत नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही याप्रसंगी देत शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दील्या*
*भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष मंदार मंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सावनेर नगरीत होत असलेले नवनिर्माण तसेच विविध प्रकल्पाची माहीती देत म्हटले की मागीतली अनेक वर्षापासून रखडलेल्या कामांना आता सुरू झाली आहे अनेक कार्य पुर्ण झाले आहे आणी काही कामे प्रगती पथावर आहेत.मग शहरातील सांडपाणी वाहून भुमीगत नेणार्या नाल्या,प्रत्येक घराला योग्य स्वच्छ पेयजल आपुर्ती,घरकुल योजना, पट्टे वाटप, स्वच्छता आदी कार्यांना प्राथमिकता देण्यात येत आहे. याकरिता मा.आमदार साहेब नगर पालीकेला नीधीची कमतरता पडू देत नाही. सावनेर शहराचे नवनिर्माण करण्यासाठी आम्ही दिवरात्र झटत असल्याचे याप्रसंगी बोलून दाखवीले*

*कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप शहर अध्यक्ष मंदार मंगळे, न.प. उपाध्यक्ष राजू घुगल, गटनेते रवींद्र ठाकूर, डॉ. विजय धोटे,अशोक उमाठे, नीलेश पटे, महेश चकोले, अरविंद ताजने, कुलभूषण नवधिंगे,आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.आयोजनाचे संचालन पवन सातपुते यांनी केले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *