दै़ सिंहवाणी वृत्त, भंडारा
भंडारा : येथील पिंपळगाव रस्त्याजवळ नागपूर-रायपूर महामार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनच्या धडकेत तीन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातात तीन मुलांसह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले.
हा अपघात भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव रस्त्यावरील भाऊ का ढाब्याजवळ घडला. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक आणि पिकअप व्हॅनची जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या तीन जणांना उपचारासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भंडाराचे पोलीस अधीक्षक यांनी अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची आणि इतर तीन जण जखमी झाल्याची पुष्टी केली. अतिवेग हे एक कारण असू शकते, तथापि अपघाताचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यावरच निश्चित होईल. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

