कामठी: येथील स्थानिक एस के पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनि तालुका स्तरीय बुद्धिबळ बाजी मारत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा ही दिनांक ७/९/२०२६ ला मेरी पोस्ट पिन अकॅडमी स्कूल खसाळा मसाळा कामठी रोड येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये एकूण १६ विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांमध्ये भाग घेतला होता. यामध्ये एस के पोरवाल कॉलेजची विद्यार्थिनी रुणाली नागपुरे वयोगट १९ मुली व यथार्थ मेश्राम वयोगट १९ मुले यांनी पाचही राऊंड्सला क्लियर करत आपले स्थान जिल्हास्तराकरिता प्राप्त केले या विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रदर्शनासाठी कॉलेजच्या प्रा.डॉ मल्लिका नागपुरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर स्वप्नील दाहात सर व उपप्राचार्य व्ही बी वंजारी सर तसेच पर्यवेक्षक नरेंद्र मेंढे सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पोरवाल कॉलेजचे बुद्धिबळपटू जिल्हास्तरावर!

