कृषिमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद देवेकर यांचा सिंहवाणी परिवारातर्फे सपत्नीक सत्कार
सिंहवाणी ब्युरो/ गारगोटी
शरद देवेकर यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषि मित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आबिटकर परिवार आणि सिंहवाणी परिवारातर्फे कौटुंबिक समारंभात सत्कार करण्यात आला.
गारगोटी येथील देवेकर ऍग्रो चे श्री. शरद देवेकर यांना शासनाचा कृषी मित्र पुरस्कार जाहीर झाला असून मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत लवकरच शासकीय समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सिंहवाणी लाईव्ह न्यूज परिवार आणि आबिटकर परिवारातर्फे त्यांचा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विदुला देवेकर यांचा सत्कार सचिन घोरपडे, नाथाजी पाटील, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आलकेश कांदळकर, सिंहवाणी चे मुख्य संपादक जेष्ठ पत्रकार किशोर आबिटकर, एस. एन. पाटील सर, प्राध्यापक विशाल आहेर, भुजंगराव मगदूम, सौरभ पोतदार, सुशांत माळवी, गौरव पाटील, उदय पाटील (कुरुंदवाड ) सौ. रेखा आबिटकर आबिटकर परिवाराचे नातेवाईक आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिहवाणी च्या सहसंपादिका प्राध्यापिका किरण आबिटकर यांनी स्वागत केले. प्राजक्ता पोतदार यांनी आभार मानले.